तो आणि आपण

आज आपण सगळ्यांनीच पर्यावरण दिनाचा स्टेटस लावलाय ,आजच्या एका दिवसा पुरते आपण सर्व पर्यावरण प्रती आपल प्रेम दाखवतोय. 
हो खरच एका दिवसा पुरतेच कारण नंतर परत आम्ही तरी त्याच बातम्या वाचाव्या,  ऐकाव्या  लागणारच ! 
*प्राण्यांची   शिकार*   
*प्राण्यांचा अपघाती मृत्यू*
*प्राण्यांची विक्री*
*जंगल तोड*
*जंगलात आग*
             ह्याच बातम्या असतात बरोबर ना?? आपण पर्यावरण दिन विसरलो नाहीत पण पर्यावरण प्रती आपल कर्तव्य नक्कीच विसरलोय. मान्य आहे आपण अस काही करतही नसाल पण गुन्हेगारीला साथ देणारा आणि ती बघणारा सुध्दा गुन्हेगारच आहे आपल्या जन्मदात्याचा...
 ज्याने आपल्याला जन्म दिलाय आपण त्यालाच  संपावायला निघालोत.  
ज्याने आपल्याला त्याच्या संगोपन, संव॔धन करण्यासाठी बनवलेल तेच आपण आता त्याच्या  संरक्षणासाठी एकत्र येणं गरजेचं झालंय....ते पण आपल्या पासूनच .
 मान्य आहे लोक पैश्यासाठी,स्वताःच्या स्वास्थ्यासाठी  हे गुन्हे करतायत पण आपण पैसे कमवण्याच्या नादात आपली कर्तव्य, माणूसकी सगळ काही विसरल चाललोय. 
श्वास आपण सगळे जण घेतोय मात्र, पर्यावरणाची काळजी फक्त  काही लोक अस का?? विचार करा....
आज जर त्या मुक्याजीवाना बोलालता आल असत तर त्या सगळ्यांनी आपल्याला एकच प्रश्न विचारला असता *आम्ही कुठे कमी पडलो?*
  पर्यावरण प्रती आपल कर्तव्य ओळखा आणि त्याची काळजी घ्या.
शैले शैले न माणिक्यं  मौतिकं न गजे गजे |
साधवो नहि सर्वत्र चंन्दंनं न वने वने  ||

Comments

Post a Comment